आनंदविहार मन:स्वास्थ केंद्र

निसर्गासारखा दुसरा मित्र नाही आणि निसर्ग सहवासासारखे दुसरे मेडीटेशन नाही. या संकल्पनेस अनुसरुन ही पशुपालनाची जागा आम्ही लोकांना फिरण्यासाठी व विसाव्यासाठी उपलब्ध करुन, त्याला आनंद मनः स्वास्थ, केंद्र असे नाव दिले आहे. आज या “आनंद मनःस्वास्थ” केंद्राचे उद्घाटन माननीय सरांचे हस्ते होणार आहे. माझी अशी खात्री आहे की, भविष्यामध्ये याचा प्रशिक्षणार्थी, अंमलदार, अधिकारी व त्यांचे कुटुंबीय यांना उपयोग होईल.
निसर्गाचे एकमेंकावर असणारे अवलंबित्व व एकमेंकाना जगविण्याची वृत्ती याचा या ठिकाणी आम्ही मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी या प्रशिक्षण केंद्रतील कचऱ्याचे व्यवस्थापन करुन, ओल्या कचऱ्यावर अनेक प्रकारच्या पशु पक्षांचे पालन केले आहे. या पशु पक्षांचे उत्पन्नातुन पोलीस कल्याण निधीमध्ये भर पडली आहे. तसेच बायोगॅस सारखे बंद पडलेले प्रकल्प पुनर्जिवित झाले आहेत. हे मी अभिमानाने नमूद करु इच्छिते.