आमच्या विषयी
पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची (तासगांव )
पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची हे सन 2007 पासुन कार्यान्वित झालेले आहे. सदरचे प्रशिक्षण केंद्र सांगली पासुन 33 कि.मी. अंतरावर आणि तासगांव पासून 11 कि.मी. अंतरावरील, तुरची गावाच्या 62.50 एकर जमिनीवर विकसित केलेले आहे. सदर प्रशिक्षण केंद्रास राज्यातील पहिला ग्रो-ग्रिन व एनर्जी सेव्हींग प्रकल्प असलेचा मान प्राप्त झालेला असून, या प्रकल्पातुन निर्माण होणारे सांडपाणी हे एस.आय.बी.एफ. सिस्टीमव्दारे प्रक्रिया करुन परिसरातील वृक्षसंवर्धानासाठी आणि जमीन पुर्नभरणासाठी वापर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 08 प्रशिक्षण सत्रे पार पडली असून, त्यामध्ये 3644 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, त्यापैकी पोेलीस उपनिरीक्षक मुलभूत प्रशिक्षणाची तीन सत्रे पार पडली असून, त्यामध्ये 797 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक व पोलीस शिपाई यांची एकूण 05 सत्रे पार पडली असून त्यामध्ये एकूण 2847 पोलीस प्रशिक्षणार्थीना मुलभूत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. सध्या दि. 11/01/2021 पासुन नवप्रविष्ठ पोलीस कर्मचारी सत्र क्र.6 चे एकुण 247 प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण चालु आहे. प्रशिक्षणार्थी यांना उत्कृष्ट प्रशिक्षण देण्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील आंतरवर्ग व बाहयवर्ग पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी महाराष्ट्रातील पोलीस कर्मचारी यांची एक उत्कृष्ट नवी पिढी निर्माण करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये पर्यावरण पूरक विविध कार्यक्रम हाती घेतलेली असून त्यामध्ये गांडूळ खत प्रकल्प, 2.5 कोटी लिटर पाणी क्षमतेचे शेततळे, वॉटर ॲन्ड रेन हार्वेस्टींग, कंटूर बंडिग व वॉटर कप निर्मितीद्वारे जलपुनर्भरण, एसआयबीएफ प्लँट, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरामध्ये पवनचक्की, सॉलर पॉवर इत्यादी बाबत या प्रशिक्षण केंद्रास राज्यातील पहिला ग्रो-ग्रिन व एनर्जी सेव्हींग प्रकल्प असलेचा मान प्राप्त झालेला आहे, व तसेच समाजिक वनीकरण विभागाकडून वनश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे. केंद्र सरकार कडून फोर स्टार रेटींग प्राप्त झालेले आहे. या प्रशिक्षण केंद्राची स्मार्ट पीटीसी म्हणून निवड करण्यात आलेली आहे.