आंतरराष्ट्रीय योगा दिवस जागतिक ख्यातीचे योगसद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी ह्यांचे उपस्थितीमध्ये योगा, प्राणायाम व ध्यान करून साजरा करण्यात आला.
दिनांक 21/06/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथील मुख्य कवायत मैदान येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस जागतिक ख्यातीचे योगसद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी ह्यांचे उपस्थितीमध्ये योगा, प्राणायाम व ध्यान करून साजरा करण्यात आला. योग सद्गुरू डॉ. कृष्णदेव गिरी ह्यांनी विविध योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्व समजावून सांगितले. तसेच सुजोक चिकित्सा अनुसार ” आपला डॉक्टर आपल्या हाती ” ह्या विषयांतर्गत शरीराच्या विविध व्याधी व त्यावरील उपचार ह्याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास प्राचार्य श्री धीरज पाटील सर, उपप्राचार्य प्रशासन श्री उदय डुबल सर, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर सत्र समन्वयक श्री श्रीकृष्ण हारुगडे सर्व आंतरवर्ग व बाह्यवर्ग अधिकारी , मंत्रालयीन कर्मचारी व प्रशिणार्थी हजर होते.
Latest News
02 सप्टेंबर, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त “एक घंटा मैदान में” उपक्रमाचे आयोजन
01 मे, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 मार्च, 2026
वृंद परिषद
23 फेब्रुवारी, 2026
