कचरा व्यवस्थापन

पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची हे सन 2007 पासुन कार्यान्वित झालेले आहे. सदरचे प्रशिक्षण केंद्र सांगली पासुन 33 कि.मी. अंतरावर आणि तासगांव पासून 11 कि.मी. अंतरावरील, तुरची गावाच्या 62.50 एकर जमिनीवर विकसित केलेले आहे. सदर प्रशिक्षण केंद्रास राज्यातील पहिला ग्रो-ग्रिन व एनर्जी सेव्हींग प्रकल्प असलेचा मान प्राप्त झालेला असून, या प्रकल्पातुन निर्माण होणारे सांडपाणी हे एस.आय.बी.एफ. सिस्टीमव्दारे प्रक्रिया करुन परिसरातील वृक्षसंवर्धानासाठी आणि जमीन पुर्नभरणासाठी वापर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.