1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
दिनांक १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन निमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची ता. तासगाव येथे उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजावंदनाने करण्यात आली. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी राज्याच्या प्रगतीसाठी आणि कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी आपली बांधिलकी व्यक्त केली.
या प्रसंगी माननीय प्राचार्य धीरज पाटील यांनी मार्गदर्शन करताना महाराष्ट्राच्या स्थापनेचा इतिहास, राज्याच्या विकासातील टप्पे तसेच पोलीस दलाची भूमिका यावर विचार मांडले.
सदर कार्यक्रमात सर्व अंतर्गत व बाह्य वर्ग अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून महाराष्ट्र दिन साजरा केला.
Latest News
01 May, 2026
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
11 Mar, 2026
वृंद परिषद
23 Feb, 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम
23 Feb, 2026
